Monday, December 4, 2017

तावडे काका गुरूजींना शिकवू द्या

तावड़े काका...गुरूजीला शिकवू द्या




गुरु...गुरुजी...मास्तर..सर... अशा विविध बिराद्वल्या घेवून अनादी काळापासून शिक्षक आपल काम इमाने इतबारे करत आहे(काही कामचुकार अपवाद वगळता)..दोन आकडी पगारावर काम करणाऱ्या गुरुजीचा पगार चार आकडी झाला अन अनेकांचा पोटशूळ उठला...मास्तरला अकलीपेक्षा जादा पगार आहे भो... अश्या बोंबा रिकाम टेकड्याकडून ठोकल्या जावू लागल्या....मस्तवाल सरकारला या रिकाम टेकड्याचाच आवाज ऐकू येतोय कि काय अशी आजची अवस्था आहे. शैक्षणिक कामे सोडून अशैक्षणिक अन ऑंनलाईन कामाच्या गिरणीत गुरुजी भरडला जात आहे. मुका बिचारा गुरुजी कुणीही हका अशी त्याची अवस्था झाली आहे. गुरुजीचा मस्तवाल पुढारी मात्र यातही आपल्या चमकोगिरीच्या स्वार्थाची पोळी शेकून घेत आहे!

कंबरड मोडोस्तवर गुरुजीवर अशैक्षणिक कामाचा बोजा लादला जात आहे अन वरून गुणवत्तेच्या अवास्तव अपेक्षा त्याच्याकडून केल्या जात आहे. यातून मराठी शाळाच बंद पाडून बहुजनाच्या पोरांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेण्याचा तर कावेबाज डाव सरकार खेळत नाही ना...?

-हा तर मराठी शाळा बंद पाडण्याचा सरकारचा डाव

-अशैक्षणिक कामाच्या ओझ्याने गुरुजी कोलमडला

-ऑंनलाईनचा बागुलबुवा थांबवा

- महिला शिक्षक भगिनींचे हाल

-मतलबी चमको पुढारी

-निवडणुकांची कामे गुरुजीवर का लादली जात आहेत?

-शिक्षक आमदार कपिल पाटील यांचे मुख्यमंत्र्याना पत्र :

- धाव शिक्षका धाव....
▫▫▫▫▫▫