Monday, December 4, 2017

तावडे काका गुरूजींना शिकवू द्या

तावड़े काका...गुरूजीला शिकवू द्या




गुरु...गुरुजी...मास्तर..सर... अशा विविध बिराद्वल्या घेवून अनादी काळापासून शिक्षक आपल काम इमाने इतबारे करत आहे(काही कामचुकार अपवाद वगळता)..दोन आकडी पगारावर काम करणाऱ्या गुरुजीचा पगार चार आकडी झाला अन अनेकांचा पोटशूळ उठला...मास्तरला अकलीपेक्षा जादा पगार आहे भो... अश्या बोंबा रिकाम टेकड्याकडून ठोकल्या जावू लागल्या....मस्तवाल सरकारला या रिकाम टेकड्याचाच आवाज ऐकू येतोय कि काय अशी आजची अवस्था आहे. शैक्षणिक कामे सोडून अशैक्षणिक अन ऑंनलाईन कामाच्या गिरणीत गुरुजी भरडला जात आहे. मुका बिचारा गुरुजी कुणीही हका अशी त्याची अवस्था झाली आहे. गुरुजीचा मस्तवाल पुढारी मात्र यातही आपल्या चमकोगिरीच्या स्वार्थाची पोळी शेकून घेत आहे!

कंबरड मोडोस्तवर गुरुजीवर अशैक्षणिक कामाचा बोजा लादला जात आहे अन वरून गुणवत्तेच्या अवास्तव अपेक्षा त्याच्याकडून केल्या जात आहे. यातून मराठी शाळाच बंद पाडून बहुजनाच्या पोरांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेण्याचा तर कावेबाज डाव सरकार खेळत नाही ना...?

-हा तर मराठी शाळा बंद पाडण्याचा सरकारचा डाव

-अशैक्षणिक कामाच्या ओझ्याने गुरुजी कोलमडला

-ऑंनलाईनचा बागुलबुवा थांबवा

- महिला शिक्षक भगिनींचे हाल

-मतलबी चमको पुढारी

-निवडणुकांची कामे गुरुजीवर का लादली जात आहेत?

-शिक्षक आमदार कपिल पाटील यांचे मुख्यमंत्र्याना पत्र :

- धाव शिक्षका धाव....
▫▫▫▫▫▫

शेवटी मुंबई मुख्याध्यापक संघटनेचा विजय झाला!

*शेवटी मुंबई मुख्याध्यापक संघटनेचा विजय झाला!!*
★★★★★★★★★★★★★★

*दहावी आणि बारावीची परीक्षा केंद्रावर ११;३० पर्यत प्रवेश देण्यात येईल*

*मुंबई - दहावी आणि बारावीची परीक्षा ही विदयार्थ्यांसाठी महत्वाची असते. या परीक्षेचे गांभीर्य लक्षात घेऊन विदयार्थ्यांनी ११ वाजताच्या पेपरसाठी अर्धा तास अगोदर परीक्षावर्गात येणे अपेक्षित आहे. या परीक्षेदरम्यान अर्ध्या तासात* *विदयार्थ्यांचे हॉलतिकीट तपासणे, प्रश्नपत्रिका देणे असे करणे शक्य होणार असल्याने अर्धा तास अगोदर वर्गात सोडून ११ वाजता परीक्षा सुरु करण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे.*
*दहावी आणि बारावीच्या विदयार्थ्यांना ११ नंतर म्हणजेच साधारण ३१ मिनिटांनी उशिरा आल्यावर परीक्षेला बसता येणार नाही. परीक्षागृहात प्रवेश करताना विदयार्थ्यांचा गोंधळ होऊ नये आणि विदयार्थ्यांना तणावमुक्त पध्दतीने परीक्षा देता यावी यासाठी  परीक्षा मंडळाने हा निर्णय घेतला आहे.*
*अपवादात्मक परिस्थितीतसुध्दा विदयार्थ्यांच्या शैक्षणिक हितालाच प्राधान्य देण्यात येईल, एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, याची काळजी सरकार घेईल, असेही तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.*

***********************************