मुंबई | काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले नारायण राणे आज नव्या पक्षाची घोषणा करणार आहे. मुंबई यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे.
राणेंनी आपल्या ‘स्वाभिमान’ संघटनेचंच पक्षात रुपांतर करण्याचा निर्णय घेतलाय. ‘स्वाभिमान’ असंच पक्षाचं नाव असेल तर वज्रमूठ हे पक्षाचं चिन्ह असेल.
दरम्यान, काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राणे भाजपमध्ये जाणार याची चर्चा होती. मात्र अमित शहांच्या भेटीनंतर त्यांनी नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
No comments:
Post a Comment