मुंबई : आपल्यापैकी अनेक लोक असे आहेत ज्यांना पीएफ (PF)आणि पीपीएफ (PPF)या दोन्ही मध्ये प्रचंड गोधळ असतो. अगदी शिकलेल्या लोकांनाही यातील नेमका फरक सांगता येतोच असे नाही. म्हणूच जाणून घ्या पीएफ (PF)आणि पीपीएफ(PPF)मध्ये नेमका काय आहे फरक.
पीएफ (PF)आणि पीपीएफ (PPF) म्हणजे काय?
पीएफ(PF)आणि पीपीएफ(PPF)या दोन्हीमध्ये गोंधळून जाण्याचे काहीच कारण नाही. पीएफ(PF)अर्थातच ईपीएफ म्हणजेच एंप्लॉई प्रॉव्हिडंट फंड. हेच शुद्ध मराठीत सांगायचे तर, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी. तर, पीपीएफचा (PPF)अर्थ असा की, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी.
दोन्हीत नेमका फरक काय?
पीएफ (PF)हा केवळ नोकरदार वर्गासाठी असतो. तुम्ही सरकारी नोकरीत असा किंवा खासगी नोकरीत असा. तुमच्या मासिक पगारातील ठराविक रक्कम आपल्या ईपीएफ खात्यात जमा केली जाते. ईपीएफचे खात्याची इपीएफओ कार्यालयाकडे अधिकृत नोंद असते.
पीपीएफ (PPF)
पीपीएफ (PPF)चे खाते कोणत्याही व्यक्तीला उघडता येते. यासाठी तो व्यक्ती कोणत्या सरकारदरबारी किंवा इतर कोणत्या खासगी संस्थेत नोकरीला असायलाच पाहिजे असे बंधन नसते. अगदी नोकरी न करणारा, शेती, व्यवसायिक, गृहिणी आदि गोष्टी करणारी व्यक्तीही हे खाते उघडू शकतो. भारतातील कोणताही नागरिक कोणत्याही बॅंकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ (PPF)चे खाते उघडू शकतो.
No comments:
Post a Comment